फलटण चौफेर दि. २७ मे २०२५
नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रातील चार प्रमुख धरणांमध्ये सोमवारी रात्रीपर्यंत समाधानकारक पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे जलसाठ्यात किंचीत वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी साठा अधिक असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.भाटघर धरणात २ मिमी पावसाची नोंद झाली असून, सध्या १.६८० टीएमसी (७.१५%) साठा आहे. पाण्याची आवक ३३ क्यूसेक इतकी झाली आहेनीरा देवघर धरणात २६ मिमी पावसाची नोंद असून, सध्या १.०६४ टीएमसी (९.०७%) साठा आहे. पाण्याची आवक अद्याप सुरू झाली नाही
वीर धरणात १२ मिमी पावसाची नोंद झाली असून, साठा सर्वाधिक ३.८२३टीएमसी (४०.८४%) इतका आहे. इनफ्लो २८१ क्यूसेक आहे. नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आले आहे तर नीरा उजवा कालव्यात ७०२ क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.गुंजवणी धरणात सर्वाधिक ६५ मिमी पावसाची नोंद झाली असून, सध्या साठा ०.७७१ टीएमसी (२०.९१%) इतका आहे.चारही धरणांचा एकूण इनफ्लो: 0.328 टीएमसी सद्यस्थितीतील एकूण जलसाठा: ७.३४० टीएमसी (१५.१९%)गतवर्षी याच दिवशीचा साठा: ४.९४३ टीएमसी (१०.२३%)या वर्षीचा सुरुवातीचा पावसाळा सकारात्मक असून, वीर आणि गुंजवणी धरण परिसरात चांगली पावसाची नोंद झाली आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत मागील वर्षीच्या तुलनेत ही स्थिती आशादायक आहे. आगामी दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास पिण्याचे व शेतीसाठीचे पाणी व्यवस्थापन अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.